भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात नवोदित ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. त्याला एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. भारताने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. तसेच या आधी ऑस्ट्रेलियामध्ये भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. या दोनही मालिकेत पंतला विसरहनती देण्यात आली होती. मात्र आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ऋषभ या संघाविरुद्ध एका विशेष फटक्याची तयारी करत आहे.

भारतीय संघ टी२० सामन्यासाठी नेट्समध्ये सराव करत असल्याचा एक व्हिडीओ BCCI ने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत हा एका विशेष फटक्याचा सराव करत आहे. वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर तो स्टंपच्या मधोमध उभा राहून मागच्या दिशेला दमदार फटका लगावण्याची तयारी तो करत आहे.

दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ टी२० सामने खेळणार आहे. त्यातील पहिला सामना ६ फेब्रुवारीला वेलींग्टन येथे होणार आहे. दुसरा सामना ८ फेब्रुवारीला ऑकलंडमध्ये रंगणार आहे. तर तिसरा सामना १० फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे.