04 March 2021

News Flash

Video : धवनच्या मुलाने शोधला केस वाढवण्याचा ‘गब्बर’ उपाय

शिखरने Video कॅप्शनमध्ये 'बाल बाल बचे' असे गमतीशीर वर्णनही केले आहे

भारतीय संघाचा ‘गब्बर’ खेळाडू शिखर धवन हा आपल्या तडाखेबाज खेळीसाठी कायम चर्चेत असतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद विजयी खेळी साकारली. आव्हानाचा पाठलाग करताना त्याने नाबाद ७५ धावा केल्या आणि टीम इंडियाच्या दौऱ्याला विजयी सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले. पण तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. तरीदेखील तो एका Video मुळे सध्या चर्चेत आला आहे.

शिखर धवनने आपल्या मुलासोबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन आपला मुलगा झोराव्हर याच्यासोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओला शिखरने झकास कॅप्शन दिले आहे. धवनचा मुलगा त्याच्या खांद्यावर बसला असून त्याच्या डोक्यात मिठासारखा दिसणारा पदार्थ टाकत आहे. त्यावर धवनने ‘हा माझ्या मुलाने केस वाढवण्याच्या दृष्टीने शोधलेला उपाय’ असल्याचे कॅप्शन दिले आहे.

याच व्हिडीओ कॅप्शनमध्ये त्याने ‘बाल बाल बचे’ असेही गमतीशीर वर्णन लिहिले आहे.

दरम्यान, या मालिकेतील चौथा सामना ३१ तारखेला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:41 pm

Web Title: ind vs nz video team india gabbar shikhar dhawan shares joyful video with his son regarding to grow hairs
Next Stories
1 IND v NZ : भारतीय संघाच्या विजयात स्मृती मंधाना चमकली
2 IND vs NZ : ‘हिटमॅन’चा तडाखा; मिळवले सचिन, विराटच्या पंगतीत स्थान
3 Video : विराटने सोडला ‘लॉलीपॉप कॅच’; लगेचच केली भरपाई
Just Now!
X