कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा यजमान न्यूझीलंडने धुव्वा उडवला. यजमान न्यूझीलंडला विजयासाठी दिलेले १३२ धावांचे आव्हान त्यांनी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ७ गडी राखत पूर्ण केले. त्यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जेव्हा बाद झाला, तेव्हा विराट कोहलीने काहीसा निराळ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. विल्यमसन बाद झाल्यानंतर विराटने न्यूझीलंडच्या स्टेडियमधील चाहत्यांकडे बघूनही काही हावभाव करत आनंद साजरा केला. हा प्रकार एका पत्रकाराला रूचला नाही, त्यामुळे विराटला त्याने याबाबत प्रश्न विचारला. पण त्यामुळे भर पत्रकार परिषदेत विराटचा पारा चढल्याचे दिसून आले.

लाजिरवाण्या पराभवानंतरही टीम इंडियासाठी ‘गुड न्यूज’

नक्की काय घडला प्रकार?

पत्रकार केन विल्यमसन बाद झाला तेव्हा तू विचित्र हावभाव करून जल्लोष केलास. इतकेच नव्हे तर तू स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांकडे पाहून देखील हातवारे केलेस. भारताचा कर्णधार म्हणून तू असं न वागता, मैदानावर चांगली वर्तणुक करून इतरांसमोर आदर्श ठेवला पाहिजे, असा तुला वाटत नाही का?

विराट कोहली – तुला काय वाटतं?

पत्रकार – मी तुला प्रश्न विचारला आहे.

विराट कोहली – मी तुला त्याचं उत्तर विचारतोय

पत्रकार – तू वर्तणुक सुधारून इतरांसमोर आदर्श ठेवायला हवा.

विराट कोहली – मैदानावर नक्की काय घडलं ते तू नीट माहिती करून घे आणि मगच माझ्याकडे प्रश्न विचारायला ये. अर्ध्या माहितीवरून तू असे प्रश्न विचारू शकत नाहीस. आणि जर तू यातून मसालेदार बातमी शोधत असशील, तर ही जागा योग्य नाही. मी सामनाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली आहे. त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वापरलं नाही. धन्यवाद!

पाहा व्हिडीओ –

“आधी त्या आळशी रवी शास्त्रींना हाकला”

दरम्यान, भारताने जरी कसोटी मालिका गमावली असली तरी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचे अव्वलस्थान कायम आहे.