News Flash

IND vs NZ : विराटमुळेच ‘सामनावीर’ ठरलो – मोहम्मद शमी

विराटमुळे मी यशस्वी कामगिरी करू शकलो, असेही शमी म्हणाला

भारतीय संघाने न्यूझीलंडला ८ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवत न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी धाडले. त्याने प्रथम मार्टिन गप्टिलला ५ धावांवर माघारी पाठवले. तर कॉलिन मुनरो याला ८ धावांवर बाद केले. दोनही बळी शमीने त्रिफळा उडवून घेतले आणि न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात झकास केली. त्याने या सामन्यात ६ षटकात केवळ १९ धावा देत ३ बळी टिपले त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मात्र हे यश त्याला कर्णधार विराट कोहलीमुले मिळाले असल्याचे शमी म्हणाला.

मी खूप काळानंतर संघात पुनरागमन केले होते. मी दोन वर्षात दुखापतीने आणि इतर वादांमुळे थोडा त्रस्त होतो. पण दुखापतींनी माझा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. तसेच सपोर्ट स्टाफनेही मला खूप सहकार्य केले. पण महत्वाचे म्हणजे विराटने सतत मला पुनरागमनाची पाठिंबा दिला. त्याच्यामुळे मी यशस्वी पुनरागमन करू शकलो, असे मत त्याने व्यक्त केले.

आम्ही जे यश मिळवले आहे, ते सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवले आहे. आम्ही एकमेकांना सहकार्य केल्यानेच आम्हाला विजय मिळवणे शक्य झाले. आम्ही ज्या योजना ठरवल्या होत्या त्यानुसार खेळ केला. एखादी योजना असफल ठरली तर आमच्याकडे दुसरा पर्याय तयार असतो कारण आम्ही एकत्रितपणे गोलंदाजीचे निर्णय घेतो, असे त्याने स्पष्ट केले.

न्यूझीलंडमधील आणि ऑस्ट्रेलियामधील मैदानांमध्ये फरक आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या न्यूझीलंडसारख्याच होत्या, पण तेथील मैदाने मोठी होती आणि वातावरण उष्ण होते. येथे मात्र मैदाने लहान आहेत आणि वातावरण उबदार आहे. त्यामुळे आम्हाला वातावरणानुसार खेळी करणे भाग आहे, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 5:50 pm

Web Title: ind vs nz virat kohli always backed me for comeback says mohammed shami
Next Stories
1 Video : विजयानंतर कोहलीने मैदानातच केला भन्नाट डान्स
2 IND vs NZ : छोटेखानी खेळीत अंबाती रायुडूचा विक्रम, धोनी-कोहलीला दिला धोबीपछाड !
3 IND vs NZ : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा, मोडला ब्रायन लाराचा विक्रम
Just Now!
X