05 December 2020

News Flash

मराठमोळ्या स्मृती मंधानाचं शतक, पहिल्या वन-डेत भारतीय महिला विजयी

9 गडी राखून न्यूझीलंडवर केली मात

मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेलं शतक आणि गोलंदाजीत एकता बिश्त-पुनम यादवच्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर भारतीय महिलांनी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 9 गडी राखून मात केली आहे. या विजयासह 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिलांनी 1-0 ने आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय महिलांनी न्यूझीलंडला 192 धावांवर रोखलं.

एकता बिश्त आणि पुनम यादव यांनी भेदक मारा करुन न्यूझीलंडच्या संघाला खिंडार पाडलं. मोक्याच्या क्षणी मोठ्या भागीदाऱ्या न होणं हे न्यूझीलंडच्या संघाच्या अपयशाचं प्रमुख कारण मानलं जातंय. न्यूझीलंडकडून सलामीवीर सुझी बेट्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. मात्र इतर फलंदाज मैदानात फारकाळ टिकू शकल्या नाहीत. एकता आणि पुनमचा अपवाद वगळता दिप्ती शर्मा आणि शिखा पांडेने अनुक्रमे 2 व 1 विकेट घेत मोलाची कामगिरी बजावली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्ज आणि सांगलीच्या स्मृती मंधानाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. दोघींनीही पहिल्या विकेटसाठी तब्बल 190 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने या खेळीदरम्यान आपलं शतक झळकावलं. 120 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने स्मृतीने 105 धावा पटकावल्या. विजयासाठी 3 धावा हव्या असताना मंधाना माघारी परतली. यानंतर विजयासाठीची औपचारिकता रॉड्रीग्ज आणि दिप्ती शर्मा जोडीने पूर्ण करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 12:50 pm

Web Title: ind vs nz womens smriti mandhana slams a ton india beat new zealand by 9 wickets
टॅग Smriti Mandhana
Next Stories
1 Ranji Trophy : उमेशची भेदक गोलंदाजी! ४८ धावात घेतले ७ बळी
2 IND vs NZ : ‘आम्ही चांगले खेळलो नाही’; न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची कबुली
3 हातात दगड घेण्याऐवजी त्याने व्हॉलीबॉल घेणं पसंत केलं, वाचा काश्मीरच्या साकलेन तारिकची यशोगाथा
Just Now!
X