करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्यानंतर आणखीही दोन-तीन मुद्द्यांवर त्याने भाष्य केले होते. पण आता तो वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आला आहे.

“तू तर करोना व्हायरसपेक्षाही घातक…”; ख्रिस गेलचा संताप

“प्रतिभावंत खेळाडूंना कशाप्रकारे जपायचे आणि त्यांच्या प्रतिभेचा संघासाठी सकारात्मक वापर कसा करून घ्यायचा हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अद्यापही समजलेले नाही आणि हीच पाकिस्तान क्रिकेटसाठी एक दुर्दैवी बाब आहे. पाकिस्तानकडून सलामीवीर म्हणून खेळलेला इम्रान नझीर हा खूप चांगला आणि प्रतिभावान खेळाडू होता. त्याच्या खेळीकडे नीट लक्ष देण्यात आलं असतं, तर विरेंद्र सेहवागपेक्षा भारी खेळाडू सलामीवीर फलंदाज म्हणून पाकिस्तानच्या संघाला लाभला असता. इम्रान नझीर चांगला फलंदाज होता. तो क्षेत्ररक्षणातही चपळ होता. आपण त्याच्या प्रतिभेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकलो असतो, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ते शक्य झालं नाही”, असे मत अख्तरने मांडल्याची माहिती क्रिकेटतज्ञ्ज साज सादिक यांनी दिली.

“आता पश्चात्ताप करण्यावाचून हाती काही उरलं नाही”

“तोपर्यंत क्रिकेटचे सामने होणार नाहीत”

शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी त्याच्या यू-ट्युब चॅनेलवरून चाहत्यांशी व्हिडीओ संवाद साधला होता. त्या संवादात अख्तर म्हणाला की अजून एक वर्ष तरी कोणतेही क्रिकेट सामने होणे कठीणच आहे. “तुम्ही जर मला प्रामाणिकपणे विचारलंत की हा करोनाचा प्रादुर्भाव कधीपर्यंत थांबेल, तर मला ते खरंच सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की जोपर्यंत करोनाने नक्की किती लोकं प्रभावित झाले आहेत हे स्पष्टपणे समजणार नाही, तोवर कोणीही कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळेल असं वाटत नाही”, असे मत शोएबने व्यक्त केले होते.

“आता ‘टीकटॉक’लाच सांगतो तुला ब्लॉक करायला…”

भारत-पाकिस्तान म्हणजे सासु-सुनेचं भांडण

“भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. दोन्ही देशांनी चर्चा करुन आपापसात गोष्टी समजून घ्यायला हव्यात. दोन्ही देश एकमेकांशी एवढे नाराज आहेत, जसं काही सासु-सुनेचं भांडणच…एक रागावून एका दिशेला तर एक दुसऱ्या दिशेला. लॉकडाउनचा निर्णय घेणं हा मोदींसाठी एक मोठा निर्णय होता. अशा खडतर परिस्थितीमध्ये अशा कठोर निर्णयांची गरज होती”, अशा शब्दांमध्ये शोएबने मोदींचं कौतुक केलं आहे.