07 March 2021

News Flash

Video: शतकवीर शुभमनने पकडलेला हा अफलातून झेल पाहिलात का?

हा झेल सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय

झेल पकडल्यानंतर गुडघ्यावर बसून त्याने खास पोजही दिली

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये भारताच्या शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून संघाच्या विजयाचा पाया रचला. पाच सामन्यात ११३ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा चोपणारा शुभमन गिलच्या अंतिम सामन्यातील प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र फलंदाजीबरोबरच शुभमन क्षेत्ररक्षणातही उजवा असल्याचे आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिसून आले. भारतीय संघातील चपळ खेळाडूंपैकी एक म्हणून शुभमनला का ओळखले जाते याचा प्रत्यय आज आला. सध्या शुभमनने पकडलेला हा झेल सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे.

पाकिस्तानची फलंदाजीने भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकायला सुरुवात केली. अठराव्या षटकात पाकिस्तानचे सहा गडी ४१ धावांच्या मोबदल्यात तंबूत परतले होते. धावसंख्या आणि सरासरी वाढवण्याच्या नादात विसाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूंवर पाकिस्तानी संघाचा कर्णधार हसन खान यांने रायन परागच्या फिरकी गोलंदाजीवर चेंडू सीमेपार टोलवण्याच्या उद्देशाने ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरवरून हवेत उंच फटका मारला. मात्र सीमारेषेजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला एकही खेळाडू नसल्याने मीड एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असणाऱ्या शुभमनने हवेत असणाऱ्या चेंडूवर लक्ष देत उलट धावत जाऊन हवेत झेपावत हा झेल पकडला. त्यानंतर त्याने गुडघ्यावर बसून खास पोजही दिली. शतकी खेळी केल्यानंतरही शुभमनची ही चपळपता अनेकांना भावली.

शुभमनबरोबरच इतर भारतीय श्रेत्ररक्षकांनीही गोलांदाजांना चांगली साथ दिली. अठराव्या षटकालाच भारत जिंकणार असे चित्र दिसत असतानाही एका क्षणासाठीही भारतीय क्षेत्ररक्षकांनी मैदानावर ढिलेपणा दाखवला नाही. पाकिस्तानचा संघ अवघ्या ६९ धावांवर बाद झाला असला तरी प्रत्येक धाव घेण्यासाठी त्यांना घाम गाळावा लागला असेच म्हणावे लागले. भारताचे हेच चपळ क्षेत्ररक्षण ऑस्ट्रेलियाबरोबरच्या अंतिम सामन्यात जमेची बाजू ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरचा अंतिम सामना ३ फ्रेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 12:09 pm

Web Title: ind vs pak shubman gill took a stunning catch at deep extra cover to get rid of pakistans u19 cricket teams captain hasan khan
Next Stories
1 अंडर १९ वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध ‘हा’ होता भारताचा गेम प्लान
2 वडिलांची धडपड अन् द्रविडच्या टिप्स; पाकविरुद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमन गिलचा प्रवास
3 U 19 WC : सेमीफायनलमध्ये पाकला लोळवले, भारताचा २०३ धावांनी दणदणीत विजय
Just Now!
X