मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ आफ्रिकन फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

२०१८ पासून कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात ३ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा शमी हा एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या विजयात शमीचं महत्व हे अधिक अधोरेखित होतं. कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यानंतर शमीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात घेतलेल्या ५ बळींपैकी ४ बळी हे त्रिफळाचीत होते. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : भारताच्या विजयात शमी चमकला, आफ्रिकन फलंदाजांची केली दांडी गुल