विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या ५ फलंदाजांपैकी ४ फलंदात हे त्रिफळाचीत होऊन माघारी परतले आहे. या कामगिरीसह मोहम्मद शमीला दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.

घरच्या मैदानावर खेळत असताना दुसऱ्या डावात ५ बळी घेणारे गोलंदाज –

  • करसन घावरी – विरुद्ध इंग्लंड (मुंबई १९७७)
  • कपिल देव – विरुद्ध इंग्लंड (मुंबई, १९८१)
  • मदन लाल – विरुद्ध इंग्लंड (मुंबई, १९८१)
  • जवागल श्रीनाथ – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (अहमदाबाद, १९९६)
  • मोहम्मद शमी – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (विशाखापट्टणम, २०१९)*

याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात ५ बळी घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ४ बळी घेत शमीला चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Ind vs SA : दुसऱ्या डावात मोहम्मद शमीचा मारा ठरतोय अधिक भेदक…जाणून घ्या आकडेवारी