दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल जोडीने आक्रमक फलंदाजी करत आफ्रिकन गोलंदाजीच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली आहे. रोहित आणि मयांक यांनी शतकी खेळी करत भारताला आक्रमक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला आहे.

अवश्य वाचा – Video : मयांक अग्रवालचं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक, सहकाऱ्यांनी केलं विशेष कौतुक

कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी २००४ साली कानपूरच्या मैदानावर २१८ धावांची भागीदारी केली होती. रोहित-मयांक जोडीने हा विक्रम मोडीत काढत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान पहिल्या दिवशी रोहित शर्माने शतक झळकावल्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळात मयांक अग्रवालनेही आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक भारताची बाजू अधिक भक्कम केली आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थिती भारतीय संघात रोहितला स्थान देण्यात आलं होतं. रोहितनेही आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आपली निवड योग्य ठरवली आहे.

यादरम्यान रोहित-मयांक जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही आपल्या नावे जमा केला आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांनी २००८ साली २६८ धावांची भागीदारी केली होती. रोहित-मयांक जोडीने हा पल्ला पार करत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : ‘हिटमॅन’ चमकला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी बरोबरी