दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने आपण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठीही योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान रोहितने राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सलग ७ डावांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानावर आला आहे. सप्टेंबर २०१६ पासून रोहितने ७ वेळा अशी कामगिरी केली आहे.

  • रोहित शर्मा – ७ (सप्टेंबर २०१६ ते आतापर्यंत)
  • एव्हरटॉन वीक्स – ६ (नोव्हेंबर १९४८ ते फेब्रुवारी १९४९)
  • राहुल द्रविड – ६ (नोव्हेंबर १९९७ ते मार्च १९९८)
  • अँडी फ्लॉवर – ६ (मार्च १९०९३ ते नोव्हेंबर २०००)

दरम्यान चेतेश्वर पुजारानेही दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत रोहितला चांगली साथ दिली. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.