भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने २०३ धावांनी बाजी मारली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी फलंदाजीत पहिला कसोटी सामना गाजवला. मयांकने पहिल्या डावात द्विशतक तर रोहित शर्माने दोन्ही डावात शतकं झळकावत आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही संघातल्या खेळाडूंनी षटकारांचा पाऊस पाडला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा कसोटी सामना सर्वात जास्त षटकारांची नोंद झालेला सामना ठरला आहे. दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून या सामन्यात तब्बल ३६ षटकार ठोकले.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले गेलेले सामने –

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २०१९-२० ( ३६ षटकार)
  • पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – २०१४-१५ (३५ षटकार)
  • पाकिस्तान विरुद्ध भारत – २००५-०६ (२७ षटकार)
  • बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – २०१३-१४ (२७ षटकार)

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात १३ षटकार ठोकले. याशिवाय मयांक अग्रवालने या कसोटीत ६ तर भारताच्या रविंद्र जाडेजा आणि आफ्रिकेच्या डीन एल्गर यांनी प्रत्येकी ४-४ षटकार ठोकले.

पहिल्या कसोटीत षटकार ठोकणारे खेळाडू –

  • रोहित शर्मा – १३
  • मयांक अग्रवाल – ६
  • रविंद्र जाडेजा/डीन एल्गर – ४
  • क्विंटन डी-कॉक/चेतेश्वर पुजारा – २
  • फाफ डु-प्लेसिस, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, एडन मार्क्रम, पिडीट – १

दरम्यान ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळवला जाणार आहे.