X
X

Video : विराट कोहलीने घेतलेला हा झेल एकदा पाहाच…तुम्हीही थक्क व्हाल !

READ IN APP

कोहलीने आफ्रिकन कर्णधाराला धाडलं माघारी

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, ५ गडी गमावत १४९ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार क्विंटन डी-कॉकच्या अर्धशतकी खेळामुळे पाहुणा आफ्रिकेचा संघ सामन्यात आश्वासक धावसंख्या उभारु शकला. डी-कॉकने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.

रेझा हेंड्रिग्ज माघारी परतल्यानंतर डी-कॉकने आफ्रिकेचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने डी-कॉकचा सुरेख झेल पकडत त्याला माघारी धाडलं. विराट कोहलीने घेतलेल्या या अफलातून झेलचं समालोचकांसह सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं.

https://twitter.com/BCCI/status/1174332964592701445

दरम्यान अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी धीम्या गतीने चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश लावला. तरीही अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत आफ्रिकेने भारताला १५० धावांचं आव्हान दिलंच.

20
X