14 December 2019

News Flash

Video : बाऊन्सर चेंडू मयांक अग्रवालच्या थेट हेल्मेटवर आदळला, आणि….

११ व्या षटकात घडला प्रकार

३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने पुणे कसोटीत सावधपणे सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतकं झळकावलेला रोहित शर्मा पुणे कसोटीत पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला.

दरम्यान आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात भेदक मारा करत भारतीय गोलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. ११ व्या षटकात सर्व भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकेल असा प्रसंग पडला. नॉर्ट्जेने टाकलेला बाऊन्सर चेंडू मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला, यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकलाही हा चेंडू अडवता आला नाही.

दरम्यान दोन्ही फलंदाजांनी पहिला गडी माघारी परतल्यानंतर भारताला शंभर धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

First Published on October 10, 2019 12:55 pm

Web Title: ind vs sa 2nd test bouncer ball hit mayank agrawal head watch video here psd 91
Just Now!
X