दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवत भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतच २-० ने आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत त्याला दिलेली साथ या जोरावर भारताने पुण्यात पार पडलेल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा ११ वा कसोटी मालिका विजय ठरला. याआधी एकाही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. ऑस्ट्रेलियाच्या नावावर घरच्या मैदानावर खेळत असताना सलग १० मालिका विजयांची नोंद आहे.

या विजयासह भारताचं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं अव्वल स्थानही अधिक भक्कम झालं आहे. भारतीय संघ सध्या ४ सामन्यांत ४ विजय मिळवत २०० गुणांसह अव्वल स्थानी आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका –

  • भारत – २०० गुण
  • न्यूझीलंड – ६० गुण
  • श्रीलंका – ६० गुण
  • ऑस्ट्रेलिया – ५६ गुण
  • इंग्लंड – ५६ गुण
  • वेस्ट इंडिज – ० गुण
  • दक्षिण आफ्रिका – ० गुण
  • बांगलादेश – ० गुण
  • पाकिस्तान – ० गुण

या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA 2nd Test : ‘पुण्यनगरी’त विराटसेनेने रचला इतिहास! आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात