दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघाने अखेरच्या कसोटी सामन्यावरही आपली पकड घट्ट केली आहे. रांची कसोटीत सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या शतकी खेळाच्या जोरावर बारताने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताने पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे यजमान संघाची सुरुवात खराब झाली.

यानंतर रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणेसोबत द्विशतकी भागीदारी रचली. २६७ धावांच्या या भागीदारीने रोहित-अजिंक्य जोडीने सर्वोत्तम ३ जोड्यांमध्ये स्थान मिळवलं आहे.

आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोड्या –

  • मयांक अग्रवाल – रोहित शर्मा – (विशाखापट्टणम, २०१९) – ३१७ धावा
  • राहुल द्रविड – विरेंद्र सेहवाग – (चेन्नई, २००८) – २६८ धावा
  • रोहित शर्मा – अजिंक्य रहाणे – (रांची, २०१९) – २६७ धावा

दरम्यान आपलं शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणे ११५ धावांवर लिंडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्लासेनकडे झेल देऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – Ind vs SA : अजिंक्यची रोहितसोबत द्विशतकी भागीदारी, दिग्गज त्रिकुटाला दिला धोबीपछाड