विशाखापट्टणम पाठोपाठ पुणे कसोटीत बाजी मारल्यानंतर रांचीच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली असली तरीही अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघासोबत पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा हे दोन फलंदाज अवघ्या १६ धावांमध्ये माघारी परतले.

३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन आकडी धावसंख्येवर भारताचे दोन गडी माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने ३२४ धावसंख्येवर तर पुणे कसोटीत १६३ धावसंख्येवर दुसरा गडी गमावला होता. कगिसो रबाडाने मयांक अग्रवाल आणि पुजाराला माघारी धाडलं. पुजारा १० तर चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता माघारी परतला.