18 September 2020

News Flash

Ind vs SA : रांचीच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची षटकारांची आतिषबाजी

धोनी-सेहवागलाही टाकलं मागे

आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत तिसरं शतक झळकावत रोहित शर्माने संघातली आपली निवड सार्थ ठरवली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले होते. मात्र रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणेच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली. २१२ धावांवर रोहित कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर एन्गिडीकडे झेल देऊन माघारी परतला. रोहितच्या या खेळीत २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – Ind vs SA : ‘हिटमॅन’ची गाडी सुस्साट, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला

या खेळीदरम्यान रोहित कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने ५१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याने धोनीचा ७८ धावांचा विक्रम मोडला आहे.

रोहितने ९५ धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावलं. तर दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपलं पहिलं द्विशतक झळकावलं. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरं द्विशतक ठरलं आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : रोहित शर्माचं कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक, साधला अनोखा योगायोग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:48 pm

Web Title: ind vs sa 3rd test rohit sharma becomes fastest indian cricketer to smash 50 6s in test psd 91
Next Stories
1 Ind vs SA : ‘हिटमॅन’ची गाडी सुस्साट, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला
2 Ind vs SA : रोहित शर्माचं कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक, साधला अनोखा योगायोग
3 Ind vs SA : रोहितने भारताचा वनवास संपवला, सेहवागनंतर अनोखी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज
Just Now!
X