भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येखील मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र आफ्रिकेच्या भारत दौऱ्यातील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी धर्मशाळेत ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे संध्याकाळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे, धर्मशाळा येथील मैदानावरील कर्मचारी खेळपट्टी आणि मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये धर्मशाळा भागात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी आणि मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी जातो. त्यातचं हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर पहिल्या टी-२० चा खेळ होतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – …म्हणून आफ्रिकेविरुद्ध मालिकेत कुलदीप-चहलला भारतीय संघात स्थान नाही !