दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठयावर आहे. पहिला डाव १६२ धावांवर आटोपलेल्या आफ्रिकेने फॉलो-ऑननंतरही खराब खेळ केला. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना त्यांची अवस्था ८ बाद १३२ अशी झाली. आता भारताला विजयासाठी केवळ २ गडींची गरज आहे, तर आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी २०३ धावा करायच्या आहेत.

Video : चेंडू हेल्मेटवर लागून फलंदाज जमिनीवर कोसळला…

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सलामीवीर डीन एल्गर चांगला खेळत असताना त्याला चेंडू लागल्याने तो १६ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत आजचा पराभव उद्यावर ढकलला. सध्या डे ब्रून ३० धावांवर तर रबाडा १२ धावांवर खेळत आहे. मोहम्मद शमीने ३, उमेश यादवने २ तर जाडेजा व अश्विनने १-१ बळी टिपला.

Video : ..आणि हवेतच उमेश यादवने केला भन्नाट रन-आऊट

त्याआधी, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ झगडावे लागले.

विराट-रोहितला हसू अनावर

Video : …अन् डु प्लेसिस मैदानात येताच विराट-रोहितला हसू अनावर

दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. पण ६२ धावांवर तो बाद झाला. त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. पाठोपाठ ३२ धावा काढून बावुमाही बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा हेन्रीक क्लासें स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या शेवटी आफ्रिकेची अवस्था ६ बाद १२९ धावा केल्या. जॉर्ज लिंड (३७) याने काही काळ संघर्ष केला. पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला ३३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात उमेश यादवने ३ बळी तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम व रवींद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.