दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने भारताचा डाव सावरला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि दमदार शतक ठोकले.

IND vs SA : पुन्हा दिसला रोहितचा ‘हिटमॅन’ अवतार, केला ‘हा’ नवा विक्रम

पहिल्या सामन्यात दोन शतके ठोकलेला रोहित दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला होता. पण रोहितने तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करत पुन्हा आपली लय परत मिळवली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आला. त्यानंतर आणखी षटकार ठोकत त्याने शतक झळकावले. त्याने खेचलेला षटकार हा रोहितचा मालिकेतील १६ वा षटकार ठरला. त्याचसोबत एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने रचला.

IND vs SA : ऐकावं ते नवलंच! खराब हॉटेल्स, जेवणावर आफ्रिकेने फोडलं पराभवाचं खापर

त्याचसोबत त्याने आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. रोहितचे हे एका वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून नववे शतक ठरले. एका वर्षाच्या कालावधीत ९ शतके ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ यांनीदेखील हा विक्रम केला होता. त्यांच्याच पंगतीत आता रोहितला स्थान मिळाले.

IND vs SA : …म्हणून शाहबाज नदीमला मिळालं संघात स्थान; विराटने सांगितलं कारण

दरम्यान, उपहारानंतरच्या सत्रात रोहितने आपलं अर्धशतक झळकावत भारताला शतकी धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. सुरुवातीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांचा संयमाने सामना करत रोहित-अजिंक्यने भारतीय संघाला सावरले. या दरम्यान रोहितने आपल्या ठेवणीतले काही खास फटकेही खेळत शतक झळकावले.