03 August 2020

News Flash

Ind vs SA : जाणून घ्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान कशी असेल हवामानाची स्थिती??

पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मोहालीच्या मैदानावर आज दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात हवामानाची स्थिती काय असेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मोहालीमध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे. संध्याकाळी ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय रंगणार हे निश्चित झालं आहे.

मोहालीचं मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जातं. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 3:50 pm

Web Title: ind vs sa mohali weather forecast today will rain play spoilsport at mohali as well psd 91
Next Stories
1 IND vs SA : टी-२० सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारताची डोकेदुखी
2 कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
3 ऋषभच्या खेळात शिस्त यायला हवी – फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड
Just Now!
X