13 August 2020

News Flash

IND vs SA : टी-२० सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारताची डोकेदुखी

आज दुसरा टी २० सामना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या उभय संघांमधील टी-२० मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज दुसरा टी-२० सामना पंजाबमधील मोहाली येथे खेळण्यात येणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. गेल्या काही कालावधीतील आणि मोहालीच्या स्टेडियमवरील दोनही संघांची कामगिरी पाहिली, तर त्यात निश्चितच टीम इंडियाचे पारडे जड आहे. पण या स्टेडियमचा कानाकोपरा माहिती असलेला दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलर या भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर हा IPL मध्ये पंजाब संघाकडून गेले काही हंगाम खेळतो आहे. त्याने पंजाबला अनेक सामने जिंकवून दिले. बऱ्याच कालावधीपासून तो पंजाबच्या संघात असल्याने त्याला मोहालीतील स्टेडिअमची चांगल्याप्रकारे पारख आहे. त्याने त्या मैदानावर खूप काळ सराव केला आहे. तसेच मोहालीच्या मैदानावर टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये डेव्हिड मिलर हा दुसऱ्या स्थानी आहे. त्याने एकूण ७३० धावा ठोकल्या आहेत.

 

डेव्हिड मिलर

दरम्यान, मायदेशात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही टी-२० सामना जिंकता आलेला नाही. २०१५ च्या मालिकेत उभय संघांत भारतात दोन सामने झाले आणि दोन्ही सामने आफ्रिकेने धावांचा पाठलाग करून जिंकले. पण भारतीय संघाने मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन सामने खेळले आहेत. त्यात २००९ मध्ये श्रीलंकेवर आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर भारताने विजय मिळवला होता.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने मोहालीत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी एक एकदिवसीय (१९९३) आणि एका कसोटी (२०१५) सामन्यात आफ्रिकेला यजमानांकडून हार मानावी लागली होती. पण उर्वरित दोन सामन्यांत आफ्रिकेने पाकिस्तान आणि आणि नेदरलँड्सला धूळ चारली होती. याशिवाय, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत १३ टी-२० सामने झाले आहेत. त्यापैकी ८ मध्ये भारताने विजय मिळवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 2:25 pm

Web Title: ind vs sa t20 team india south africa david miller headache vjb 91
Next Stories
1 कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
2 ऋषभच्या खेळात शिस्त यायला हवी – फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड
3 पाकिस्तानातील हिंदू विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूबाबत शोएब अख्तर म्हणतो…
Just Now!
X