16 October 2019

News Flash

“कसोटीत सलामीवीर म्हणून रोहितची कामगिरी सामान्यच”

न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केलं मत

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि रोहितला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याच्या खेळीची साऱ्यांनी स्तुती केली, पण न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशम याने मात्र हातचं राखून त्याची स्तुती केली.

जेम्स निशम

रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याबाबत ट्विटरवर एका युझरने ‘कसोटी क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून रोहितच्या खेळीबद्दल तुला काय वाटतं’ असं निशमला प्रश्न विचारला. त्यावर ‘कसोटीत सलामीवीर म्हणून रोहितच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याची कामगिरी सामान्यच होती’, असे ट्विट करून उत्तर दिले.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने ५०२ धावांवर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकेने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात पुन्हा धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे आफ्रिकेपुढे दीड दिवसांत डोंगराएवढे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना तळाच्या डेन पिटने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याला इतर कोणाचीही साथ मिळू शकली नाही. त्यामुळे आफ्रिकेला सामना वाचवता आला नाही.

First Published on October 9, 2019 12:27 pm

Web Title: ind vs sa team india rohit sharma as opener in test cricket was ok says new zealand james neesham vjb 91