News Flash

Ind vs SA : भारताला धक्का,जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर; उमेश यादवला संधी

२ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवची आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

२ ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेसाठी निवड समितीने याआधीच भारतीय संघाची घोषणा केली आहे.

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 5:17 pm

Web Title: ind vs sa umesh yadav replace injured jasprit bumrah for test series psd 91
Next Stories
1 BCCI ची सार्वत्रिक निवडणूक २३ ऑक्टोबरला – विनोद राय
2 Video : भर मैदानात चाहतीनं पंतला सांगितली ‘दिल की बात’ अन्…
3 ऋषभ पंतची धोनीशी तुलना करणं अयोग्य, माजी भारतीय खेळाडूचा ऋषभला पाठींबा
Just Now!
X