News Flash

Video : श्रेयसचा उत्तुंग षटकार…चेंडू थेट छतावर आणि कर्णधार विराटही झाला अवाक

तिसऱ्या क्रमांकावर श्रेयसची आश्वासक फलंदाजी

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे, अखेरचा टी-२० सामना जिंकणं श्रीलंकेला गरजेचं बनलेलं आहे. लंकेने विजयासाठी दिलेलं १४३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं. लोकेश राहुलने धडाकेबाज ४५ धावा केल्या, त्याला श्रेयस अय्यर आणि कर्णधार विराट कोहलीनेही चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – IND vs SL : नवीन वर्षाची विराटकडून दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद

शिखर धवन आणि लोकेश राहुल जोडी माघारी परतल्यानंतर श्रेयस आणि विराटने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. १६ व्या षटकात हरसंगाच्या गोलंदाजीवर श्रेयसने उंच षटकार खेचला. श्रेयसच्या या फटक्यात इतकी ताकद होती की चेंडू थेट छतावर जाऊन पडला….कर्णधार विराट कोहलीही हा फटका पाहून अवाक झाला. विराटच्या चेहऱ्यावरचे भाव हे यावेळी पाहण्यासारखे होते. पाहा श्रेयसच्या या उत्तुंग षटकाराचा व्हिडीओ…

दरम्यान २६ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार खेचत श्रेयस अय्यरने ३४ धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी अवघ्या काही धावा शिल्ल्क असताना तो माघारी परतला. या मालिकेतला अखेरचा सामना शुक्रवारी पुण्यात खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – IND vs SL : अवघी एक धाव आणि रोहितला मागे टाकत विराट ठरला अव्वल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 10:51 am

Web Title: ind vs sl 2nd t20i shreyas hits a monster six virat enjoys psd 91
Next Stories
1 Ranji Trophy : तामिळनाडूविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात बदल, आदित्य तरेकडे नेतृत्व
2 IND vs SL : नवीन वर्षाची विराटकडून दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद
3 न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रोहित सज्ज
Just Now!
X