News Flash

IND vs SL : अवघी एक धाव आणि रोहितला मागे टाकत विराट ठरला अव्वल

दुसऱ्या टी-२० सामन्यात केला विक्रम

२०२० वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध इंदूरच्या मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

२०१९ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोण काढतं यासाठी रोहित आणि विराटमध्ये शर्यत लागली होती. मात्र २०१९ वर्षातला अखेरचा टी-२० सामना खेळल्यानंतर दोघांमधली ही शर्यत बरोबरीत सुटली होती. दोन्ही फलंदाज २०१९ वर्षाच्या अखेरीस २६३३ धावांनिशी संयुक्तपणे अव्वल स्थानी होते.

मात्र रोहित शर्माने लंकेविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती घेतली असल्यामुळे विराटकडे रोहितला मागे टाकण्याची चांगली संधी होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या टी-२० सामन्यात लंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शिखर-लोकेश राहुल जोडी माघारी परतल्यानंतर विराटने एक धाव काढत रोहितला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 9:58 pm

Web Title: ind vs sl 2nd t20i virat kohli becomes leading run scorer in t20i cricket gets pass rohit sharma psd 91
Next Stories
1 महाराष्ट्र केसरी : हर्षवर्धनला लहानपणापासूनच्या कष्टाचं फळ मिळालं !
2 महाराष्ट्र केसरी: कुस्ती संपली आता दोस्ती!
3 Ind vs SL 2nd T20I : नवीन वर्षाची सुरुवात विजयाने, ७ गडी राखून भारत विजयी
Just Now!
X