युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर त्याची भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. विशेष म्हणजे इशानचा पहिल्या एकदिवसीय वाढदिवसही आहे. तो आपला २३वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे आजचा दिवस त्याच्यासाठी खास ठरला. वाढदिवसाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या दौर्‍यावर सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधारपद सांभाळत आहे, तर उपकर्णधारपदी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली आहे. इशानचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश होता.

 

झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा किशन आपल्या स्फोटक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. डावखुरा फलंदाज किशनआधी भारताच्या गुरशरण सिंग यांनीही वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९९०मध्ये हॅमिल्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती. किशनशिवाय मुंबईच्या सूर्यकुमार यादवनेही आज वनडे स्वरूपात पदार्पण केले.

हेही वाचा – VIDEO : स्टेडियमबाहेर चार जणांना घातल्या गोळ्या..! प्रेक्षकांची पळापळ

इशानने आतापर्यंत दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यावर्षी मार्चमध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने ४४ प्रथम श्रेणी सामन्यात ५ शतके आणि १५ अर्धशतकांसह २६६५ धावा केल्या आहेत.