News Flash

SL vs IND : हार्दिक पंड्यासह ९ भारतीय क्रिकेटपटू टी-२० मालिकेबाहेर!

हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याला झालीय करोनाची लागण

ind vs sl nine players including hardik pandya prithvi shaw out of t20 series against sri lanka
हार्दिक आणि कृणाल पंड्या

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज बुधवारी खेळला जाईल. हा सामना काल मंगळवारी २७ जुलै रोजी खेळला जाणार होता, परंतु कृणाल पंड्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता या टी-२० मालिकेतून ९ भारतीय खेळाडू बाहेर पडले आहेत.

इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशन, सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत. हे सर्वजण कृणालच्या संपर्कात होते, अशी चर्चा होती.

दिलासादायक बातमी म्हणजे, कृणालच्या संपर्कात असलेल्या आठ लोकांची पहिली करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सूत्रांनुसार आज बुधवारी दोन्ही संघांच्या खेळाडूंची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. काही क्रिकेटपटू पूर्णपणे क्वारंटाइन आहेत आणि त्यांना मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळता येणार नाहीत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा – Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

श्रीलंकेच्या आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत, कृणाल ३० जुलैला उर्वरित भारतीय संघासह मायदेशी परत येऊ शकणार नाही. अनिवार्य क्वारंटाइन कालावधीनंतर त्याला निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणीची प्रतीक्षा करावी लागेल. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-२० सामना ३८ धावांनी जिंकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 4:24 pm

Web Title: ind vs sl nine players including hardik pandya prithvi shaw out of t20 series against sri lanka adn 96
Next Stories
1 Tokyo 2020 : तिरंदाज दीपिका कुमारीनं अमेरिकेच्या खेळाडूला चारली धूळ!
2 Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
3 SL vs IND 2nd T20 : कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार लाइव्ह सामना?
Just Now!
X