भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. सलामीवीर कुसल परेरा वनडे आणि टी-२० मालिका खेळणार नाही आणि दासुन शनाका संघाचा कर्णधार असेल. धनंजय डी सिल्वाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रीलंकेचा ६ फूट ७ इंचांचा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो देखील वनडे मालिकेत खेळणार नाही. दुखापतीमुळे तो केवळ टी-२० मालिकेसाठी उपलब्ध असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका १८ जुलैपासून सुरू होणार आहे. टी-२० मालिका २५ जुलैपासून सुरू होईल.

वनडे मालिका

१) पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै

 

टी-२० मालिका

१) पहिला टी – २० सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

हेही वाचा – १०० वर्षाच्या सुपरफॅननं केलं असं काही की मेस्सीही भारावला!

श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्वा (उप-कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसांका, चरित असालान्का, वानेंदू हसरंगा, एशेल बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, बिनुरा फर्नांडो (एकदिवसीय मालिकेतून बाहेर), दुश्मंता चमीरा, लक्ष्मण संदाकन, अकिला धनंजय, शिरण फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरात्ने, प्रवीम जयविक्रमा, कसुन रजीता, लाहिरू कुमारा आणि इसरू उदाना.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.