टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात अखेरीस फॉर्मात परतला आहे. चेन्नईच्या मैदानात विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे भारताची सुरुवातही खराब झाली होती. यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळाने रोहितही माघारी परतला.

अवश्य वाचा – ….म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा

यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या तरुण जोडीने डावाची सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक झळकावत भारताला सन्मानजनक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ११४ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत या सामन्यात ६९ चेंडूत ७१ धावांची खेळी करुन माघारी परतला. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

अवश्य वाचा – दुखापतग्रस्त भुवनेश्वर न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार??

यादरम्यान पंतने महेंद्रसिंह धोनी आणि इतर दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. चेपॉकच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत आता पंतचं नाव आलेलं आहे.

दरम्यान श्रेयस अय्यरनेही ऋषभ पंतला चांगली साथ दिली. अय्यरने ८८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ७० धावा केल्या.

अवश्य वाचा – IND vs WI : पहिल्याच सामन्यात विराट अपयशी, दांडी गुल करत शेल्डन कोट्रेलने रचला इतिहास