वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विंडीजने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना राहुलने भारतीय संघाकडून चांगली सुरुवात केली. या सामन्याआधी हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी राहुलला केवळ २६ धावांची गरज होती. अशी कामगिरी करणारा राहुल भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे.

याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह यासारख्या फलंदाजांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. दरम्यान सर्वात कमी डावांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही राहुलला तिसरं स्थान मिळालं आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला, मात्र लोकेश राहुलने विराट कोहलीच्या साथीने खेळपट्टीवर पाय रोवत विंडीजच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली.