07 March 2021

News Flash

IND vs WI : पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचं सावट

स्थानिक हवामान संस्थेने वर्तवली शक्यता

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होते आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथे शनिवार आणि रविवारी दोन टी-२० खेळवले जाणार आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. मात्र या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पावसाचं सावट आहे.

अवश्य वाचा – स्वतःला सिद्ध करण्याची ऋषभ पंतकडे संधी – विराट कोहली

फ्लोरिडा येथील Accuweather या स्थानिक हवामान संस्थेने, आज सामन्यादरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे. सामन्यादरम्यानचं वातावरणही ढगाळ असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तरुण खेळाडूंना संधी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 3:50 pm

Web Title: ind vs wi 1st t20i rain expected on first match psd 91
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 प्रशिक्षकपदासाठी जावेद मियांदाद यांनी सुचवलं ‘हे’ नाव
2 स्वतःला सिद्ध करण्याची ऋषभ पंतकडे संधी – विराट कोहली
3 IND vs WI : विराट, रोहित विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; करणार का ‘हा’ पराक्रम?
Just Now!
X