News Flash

Video : ….आणि विराटने भर मैदानात विल्यम्सच्या डायरीतली पानं फाडली

दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलं मजेशीर द्वंद्व

विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केली. विराटने या सामन्यात नाबाद ९४ धावा करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीने सर्वप्रथम लोकेश राहुल आणि त्यानंतर ऋषभ पंतसोबत भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या सामन्यादरम्यान विंडीजचा जलदगती गोलंदाज केजरिक विल्यमस आणि विराट कोहलीमध्ये एक वेगळच द्वंद्व पहायला मिळालं. विराटने कोट्रेलच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत, त्याच्याच ट्रेडमार्क स्टाईलने सेलिब्रेशन करत आपले इरादे स्पष्ट केले.

वेस्ट इंडिजचे खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. केजरिक विल्यम्स हा गोलंदाजी करताना विकेट मिळवल्यानंतर प्रतिकात्मक स्वरुपात फलंदाजाचं नाव आपल्या डायरीत लिहून ते पान फाडण्याचा अभिनय करतो. मात्र विराटने आज विल्यम्सचा डाव त्याच्यावर उलटवत बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 10:57 pm

Web Title: ind vs wi 1st t20i virat kohli brings out the notebook after hitting kesrick williams for a four and a six psd 91
टॅग : Ind Vs WI,Virat Kohli
Next Stories
1 IND vs WI : लोकेश राहुल टीम इंडियाचा नवा हजारी मनसबदार
2 IND vs WI : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहर नकोशा विक्रमाचा धनी
3 IND vs WI : एविन लुईसची धडाकेबाज खेळी, भारताविरुद्ध विक्रमाची नोंद
Just Now!
X