News Flash

Ind vs WI : विराट कोहली आज करणार मोठा विक्रम?

आज होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात आजी-माजी कर्णधारांना मोठ्या विक्रमाची संधी

Ind vs WI : विराट कोहली आज करणार मोठा विक्रम?

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात दमदार शतकी खेळी करत विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. विराट कोहलीने सर्वात जलद ३६ शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता. दुसऱ्या सामन्यातही विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

‘रन’मशीन विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा पार करण्याच्या समीप पोहचला आहे. पहिल्या सामन्यातील १४० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर २१२ एकदिवसीय सामन्यात २०४ डावांत ९९१९ धावा जमा झाल्या आहेत. विराट कोहलीने आणखी ८१ धावांची भर घातल्यास तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करू शकेल. याचप्रमाणे तो सचिनलाही मागे टाकू शकेल. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता, तर विराटच्या खात्यावर २०४ डावांची नोंद आहे. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५८.६९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटने ३६ शतके आणि ४८ अर्धशतके झळकावली आहेत.

धोनीलाही दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी :

भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या नावावर आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावांची नोंद आहे. मात्र भारतीय संघाकडून खेळताना धोनीला अद्याप दहा हजार धावा करता आल्या नाहीत. लॉर्डस येथे झालेल्या सामन्यात धोनीने आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दहा धावांचा पल्ला गाठला होता. धओनीने ३२८ एकदिवसीय सामन्यात १०,१२३ धावा केल्या आहेत. यामधील १७४ धावा धोनीने २००७ मध्ये  आशिया-११ संघाकडून खेळताना केल्या आहेत. भारतीय संघाकडून खेळताना धोनीला दहा हजार धावा करण्यासाठी ५१ धावांची गरज आहे. आज होणाऱ्या सामन्यात धोनीने ५१ धावा केल्यास भारतीय संघाकडून खेळताना दहा हजार धावांचा पल्ला पार करणारा धोनी चौथा फंलदाज होईल. आतापर्यंत भारताकडून हा कारनामा सचिन, सौरव आणि राहुल यांना करता आला आहे.

आज होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट आणि धोनी या आजी-माजी कर्णधारांना दहा हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विराट अॅण्ड कंपनीचे पारडे जड मानले जात आहे. मात्र वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत बरोबरी साधून चुरस टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

१० हजार धावांचा पल्ला गाठणारे खेळाडू – 

 • सचिन तेंडूलकर (भारत)- १८ हजार ४२६ धावा (भारत)
 • कुमार संगकारा (श्रीलंका) – १४ हजार २३४ धावा
 • रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया) – १३ हजार ७०४ धावा
 • सनथ जयसुर्या (श्रीलंका) – १३ हजार ४३० धावा
 • महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२ हजार ६५० धावा
 • इंजमाम उल हक (पाकिस्तान) – ११ हजार ७३९ धावा
 • जॅक कॅलिस (द. आफ्रिका) – ११ हजार ५७९ धावा
 • सौरभ गांगुली (भारत) – ११ हजार ३६३ धावा (भारत)
 • राहुल द्रविड (भारत) – १० हजार ८८९ धावा (भारत)
 • ब्रायन लारा (वे. इंडिज) – १० हजार ४०५ धावा
 • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – १० हजार २९० धावा
 • महेंद्र सिंग धोनी (भारत) – १० हजार १२३ धावा (* निवृत्त झालेला नाही) (भारत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 9:17 am

Web Title: ind vs wi 2nd odi ms dhoni and virat kohli near 10000 run mark
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 भारताचे पारडे जड
2 अजित पवार यांना राष्ट्रीय कबड्डी संघटनेचे वेध!
3 भारत ‘ब’ संघाच्या विजयात फिरकीपटूंची चमक
Just Now!
X