भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला. फलंदाजीत रोहित शर्मा, लोकेस राहुल, श्रेयस अय्यर तर गोलंदाजीत कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि इतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत संघाचं पारडं जड ठेवलं. मात्र या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांवर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड हे आजच्या सामन्यात भोपळाही न फोडता माघारी परतले. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघाचे कर्णधार शून्यावर माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय कर्णधार विराट कोहली कायरन पोलार्डच्या गोलंदाजीवर रोस्टन चेसकडे झेल देऊन माघारी परतला. तर विंडीजचा कर्णधार पोलार्ड मोहम्मद शमीच्या गोलंदाजवर यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला.