भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने विक्रम केला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ४०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ८४ कसोटी, २४० वन-डे* आणि ७५ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू –

१) सचिन तेंडुलकर – (६६४ सामने)

२) महेंद्रसिंह धोनी – (५३८ सामने)

३) राहुल द्रविड – (५०९ सामने)

४) मोहम्मद अझरुद्दीन – (४३३ सामने)

५) सौरव गांगुली – (४२४ सामने)

६) अनिल कुंबळे – (४०३ सामने)

७) युवराज सिंह – (४०२ सामने)

८) विराट कोहली – (४०० सामने)*

दरम्यान दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.