News Flash

IND vs WI : वा दुबेजी वा ! मुंबईकर शिवमने झळकावलं पहिलं अर्धशतक

विंडीजच्या गोलंदाजांची शिवम दुबेने केली धुलाई

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात मुळचा मुंबईकर आणि भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने आपली छाप पाडली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. भारताची सुरुवात डळमळती झालेली असताना शिवमने खेळपट्टीवर तळ ठोकून विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

शिवम दुबेने ३० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. महत्वाची गोष्ट म्हणजे एका क्षणापर्यंत धावगतीमध्ये मागे पडलेल्या भारतीय संघाला शिवमने फटकेबाजी करत पुढे आणलं.

मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. ज्युनिअर वॉल्शच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या नादात शिवमने आपली विकेट फेकली. हेटमायरने त्याचा झेल घेतला. तिसऱ्या विकेटसाठी शिवमने कर्णधार विराट कोहलीसोबत ४१ धावांची भागीदारी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 8:15 pm

Web Title: ind vs wi 2nd t20i shivam dube slams his first international t20i half century psd 91
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी
2 हे जरा अतिच झालं ! क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मागणीवर गांगुलीचं ‘दादा’ स्टाईल उत्तर
3 टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू करतोय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न
Just Now!
X