21 January 2020

News Flash

Video : जाना था जपान, पहुंच गए चीन ! अरेरे…ऋषभ पंतसोबत हे काय झालं??

अखेरच्या षटकात घडला मजेशीर प्रसंग

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे विंडीजने भारताने विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. भारतीय संघाची या सामन्यातली कामगिरी निराशाजनक राहिली. फलंदाजीत शिवम दुबे आणि ऋषभ पंत यांनी आश्वासक खेळ करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. बऱ्याच कालावधीनंतर ऋषभ पंतने खेळपट्टीवर तग धरत नाबाद ३३ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – ….तर कितीही धावा करा, कमीच पडतील – विराट कोहली

या सामन्यात ऋषभ पंतसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. शेल्डन कोट्रेल विंडीजच्या डावातलं अखेरचं षटक टाकत होता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या ऋषभच्या हातातून बॅट सुटली आणि थेट लेग-अंपायर अनिल चौधरी यांच्या जवळ जाऊन पडली. हा प्रसंग पाहून काहीकाळ समालोचकांमध्येही हशा पिकला होता…..पाहा या घटनेचा व्हिडीओ

या मालिकेतला अखेरचा सामना ११ तारखेला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ जिंकून मालिकेत बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video : पोलार्डच्या एकाच षटकात शिवम दुबेची षटकारांची हॅटट्रीक

First Published on December 9, 2019 10:03 am

Web Title: ind vs wi 2nd t20i watch video of rishabh pants flying bat psd 91
Next Stories
1 Video : पोलार्डच्या एकाच षटकात शिवम दुबेची षटकारांची हॅटट्रीक
2 ….तर कितीही धावा करा, कमीच पडतील – विराट कोहली
3 अखेरची लढत गमावूनही भारताला विजेतेपद
Just Now!
X