News Flash

…आणि तोंडावर बोट ! कोहलीला बाद करत केजरिक विल्यम्सने केला हिशेब चुकता

१९ धावांवर कोहलीला धाडलं माघारी

पहिल्या टी-२० सामन्यात बाजी मारल्यानंतर भारतीय फलंदाजांना दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांनी चांगलच झुंजवलं. सुरुवातीच्या षटकांपासून भेदक मारा करत विंडीजने भारताला १७० धावांवर रोखलं. मुंबईकर शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही या सामन्यात १९ धावा काढून माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहितला मागे टाकत विराट ठरला पुन्हा अव्वल

विंडीजचा गोलंदाज केजरिक विल्यम्स आणि विराट कोहली यांच्यात सलग दुसऱ्या सामन्यात द्वंद्व पहायला मिळालं. पहिल्या सामन्यात विल्यम्सची धुलाई केल्यानंतर विराटने त्याच्या स्टाईलमध्ये प्रतिकात्मक स्वरुपात डायरीची पानं फाडत सेलिब्रेशन केलं होतं. दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीला बाद केल्यानंतर विल्यम्सने तोंडावर बोट ठेवत आपला हिशेब चुकता केला.

अवश्य वाचा – Video : ….आणि विराटने भर मैदानात विल्यम्सच्या डायरीतली पानं फाडली

विल्यम्सच्या गोलंदाजीवर १९ धावा काढून विराट कोहली माघारी परतला. भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यमस यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कोट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – IND vs WI : वा दुबेजी वा ! मुंबईकर शिवमने झळकावलं पहिलं अर्धशतक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 9:51 pm

Web Title: ind vs wi 2nd t20i west indies kesrik williams mock virat kohli again but with different style psd 91
टॅग : Ind Vs WI,Virat Kohli
Next Stories
1 IND vs WI : रोहितला मागे टाकत विराट ठरला पुन्हा अव्वल
2 IND vs WI : वा दुबेजी वा ! मुंबईकर शिवमने झळकावलं पहिलं अर्धशतक
3 लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी
Just Now!
X