News Flash

Ind vs WI : विंडीजचा बाहुबली रहकीम कॉर्नवॉलचं कसोटी पदार्पण

दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत विंडीजची प्रथम गोलंदाजी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील जमैका येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या विंडीजच्या संघाला या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. करो या मरो अशा या कसोटी सामन्यासाठी विंडीजने संघात एक बदल केला असून, रहकीम कॉर्नवॉलला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताने मात्र आपल्या संघात कोणताही बदल केला नाहीये.

टी-२० आणि वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कॉर्नवॉलला कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं. विंडीजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये कॉर्नवॉलने चांगली कामगिरी केली होती. रहकीम कॉर्नवॉल हा मूळचा अँटिग्वाचा खेळाडू आहे. १ फेब्रुवारी १९९३ साली जन्मलेल्या २६ वर्षीय कॉर्नवॉलची उंची सुमारे ६ फूट ५ इंच आहे तर वजन अंदाजे ३०० पाऊंड आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी करतो. त्याला क्रिकेटमधील मानवी पर्वत या टोपणनावानेही ओळखले जाते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५ वर्षांपूर्वी पदार्पण केले. तेव्हापासून कॉर्नवेल याने वेस्ट इंडिज चॅम्पियनशीपमध्ये लीवार्ड आइसलँड्स हरिकेन्स संघाकडून आणि तसेच विंडिंज ए संघातून केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला. २०१६ मध्ये भारत दोऱ्यावर विंडिजच्या अध्यक्षीय संघाकडून खेळताना त्याने एका डावात ५ बळी टिपले होते. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत २४ च्या सरासरीने धावा देत २६० बळी माघारी धाडले आहेत. याशिवाय, त्याने सुमारे २४ च्या सरासरीने फलंदाजी करत १ शतक आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 8:01 pm

Web Title: ind vs wi 2nd test jamaica rahkeem cornwall debut from west indies psd 91
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 इंग्लंडला धक्का, जेम्स अँडरसन अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर
2 निवड समिती ऋषभ पंतच्या कामगिरीवर नाराज? आफ्रिका दौऱ्यानंतर पर्याय तयार ठेवणार
3 देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करत राहीन, अर्जुन पुरस्कारानंतर रविंद्र जाडेजाची प्रतिक्रीया
Just Now!
X