घरच्या मैदानावर भारताविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत खेळण्यासाठी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेल्या ख्रिस गेलला अखेरीस सूर सापडला आहे. तिसऱ्या वन-डे सामन्यात ख्रिस गेलने आक्रमक खेळी करत अर्धशतकी खेळी केली. ख्रिसने ४१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा केल्या. या खेळीदरम्यान गेलने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला.

ख्रिस गेल वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला यायला लागल्यापासून, आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ठरला आहे. इतर कोणत्याही फलंदाजाला गेलसारखी कामगिरी करता आली नाही.

दरम्यान तिसऱ्या वन-डे सामन्यात विंडीजच्या सलामीवीरांनी आक्रमक फटकेबाजी करत ९.१ षटकातच आपल्या संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. २००२ पासून विंडीजच्या संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती.

अवश्य वाचा – Ind vs WI : अखेरच्या वन-डेत विंडीज सलामीवीरांची फटकेबाजी, १७ वर्षांनी रचला विक्रम