भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात धडाकेबाज फलंदाज शेमरॉन हेटमायरने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. आपल्या संघाला वन-डे मालिकेत पहिला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हेटमायरने इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१८ पासून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हेटमायर आता तिसऱ्या स्थानी आला आहे.

भारताविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात हेटमायरने ३७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. भारताकडून आपला पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या नवदीप सैनीने हेटमायरला माघारी धाडलं.

अवश्य वाचा – २०२१ साली भारत चौरंगी मालिका खेळणार, BCCI अध्यक्षांची घोषणा

भारत दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या संघाने टी-२० आणि वन-डे मालिकेत भारताला चांगली लढत दिली. मात्र टी-२० मालिकेत त्यांना २-१ ने हार मानावी लागली होती. २०१९ सालातला भारतीय संघाचा हा अखेरचा वन-डे सामना आहे.

अवश्य वाचा –  IND vs WI : विंडीजचा होप चमकला, बाबर आझमला टाकलं मागे