मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३ गड्यांच्या मोबदल्यात २४० धावसंख्या उभारली. लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज खेळी करत भारतीय संघाची बाजू वरचढ ठेवली. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मैदानात येत विंडीज गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला.

विराट कोहलीने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७० धावा केल्या. भारताकडून सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटला पाचवं स्थान मिळालं आहे.

भारताकडून सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

  • युवराज सिंह विरुद्ध इंग्लंड – २००७ (डर्बन) – १२ चेंडू
  • गौतम गंभीर विरुद्ध श्रीलंका – २००९ (नागपूर) – १९ चेंडू
  • युवराज सिंह विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २००७ (डर्बन) – २० चेंडू
  • युवराज सिंह विरुद्ध श्रीलंका – २००९ (मोहाली) – २० चेंडू
  • विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज – २०१९ (मुंबई) – २१ चेंडू

याचसोबत विराट कोहलीने मायदेशात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत फक्त ३ फलंदाजांना अशी कामगिरी करता आलेली आहे. मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो यांनी न्यूझीलंडमध्ये तर मोहम्मद शेहजादने (पाकिस्तान/युएई) मध्ये ही कामगिरी केली आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज