News Flash

IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

अखेरच्या टी-२० सामन्यात केला विक्रम

उप-कर्णधार रोहित शर्माने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस रोहितने हा विक्रम केला आहे.

या विक्रमी कामगिरीसोबत रोहित शर्माला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहितने खणखणीत षटकार खेचत या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 7:13 pm

Web Title: ind vs wi 3rd t20i rohit sharma becomes first batsman to reach 400 sixes mark in international cricket psd 91
टॅग : Ind Vs WI,Rohit Sharma
Next Stories
1 Ranji Trophy : द्विशतकी खेळीत पृथ्वी शॉचा विक्रम, सचिन-रोहित शर्माला टाकलं मागे
2 गोलंदाज, फलंदाज नव्हे; तर अंपायर करणार विक्रम
3 मुंबईच्या मैदानात विराटसेनेने रोखलं कॅरेबिअन वादळ, टी-२० मालिकेतही मारली बाजी
Just Now!
X