राजकोट पाठोपाठ हैदराबादची विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकत भारताने मालिकेत विजय मिळवला. भारताने १० गडी राखून जिंकली. उमेश यादवचा भेदक मारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे – ऋषभ पंत जोडीची भागीदारी याच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिका २-० अशी जिंकली. विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी ३३ धावा केल्या.

विराट हा तसा आक्रमक कर्णधार आहे. पण तिसऱ्या दिवशीच्या खेळात त्याचे ‘कूल’ रूप दिसून आले. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीने चाहत्यांना एका गाण्याची आठवण करून दिली. क्षेत्ररक्षण करत असताना कोहली चाहत्यांचाही उत्साह वाढवत होता. बीसीसीएने (BCCI)ने हा व्हिडीओ ट्विट करत Make some noise, Hyderabad म्हणजेच ‘हैदराबादकरांनो, आवाज वाढवा ….’ असे लिहिले आहे.

दरम्यान, या सामन्यात उमेश यादवने १० बळी टिपत मैदानावर शार्दूल ठाकूरच्या अनुपस्थितीची जाणीव विराटला होऊ दिली नाही. त्यामुळे विराटचा हा ‘कूल’ अंदाज दिसून आला. उमेश यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.