सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर – ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात ३८७ धावांचा डोंगर उभा केला आहे. रोहित आणि लोकेश राहुलने या सामन्यात शतकी खेळी करत भारतीय संघाची बाजू वरचढ ठेवली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी २२७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने १५९ तर लोकेश राहुलने १०२ धावा केल्या.

IND vs WI : रोहितचा ‘डबल धमाका’! केला धमाकेदार पराक्रम

रोहित आणि लोकेश राहुल बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यात त्याने ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. विशेष म्हणजे श्रेयसने एकाच षटकात धमाकेदार २८ धावा ठोकल्या. रॉस्टन चेसने ४७ वे षटक टाकले. त्या षटकात त्याने दुसरा चेंडू निर्धाव टाकला. पण इतर ५ चेंडूत त्याने ४ षटकार आणि १ चौकार लगावला.

Video : झोपून सिक्स…! रोहितने मारलेला भन्नाट षटकार पाहिलात का?

पहा हा व्हिडीओ –

दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली.

IND vs WI : वन-डे क्रिकेटवर रोहितची ‘सत्ता’; केला ‘हा’ विक्रम

यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत फटकेबाजी करत भारताची बाजू अधिक भक्कम केली. ऋषभ पंत फटकेबाजी करण्याच्या नादात ३९ धावांवर माघारी परतला. मात्र श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ४९ व्या षटकात श्रेयस अय्यरची ५३ धावा काढून माघारी परतला. विंडीजकडून शेल्डन कोट्रेलने २ तर अल्झारी जोसेफ, किमो पॉल आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.