तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

…म्हणून वेस्ट इंडिजला हरवलं – विराट

भारताला विजय मिळवून देण्यात लोकेश राहुलचा सिंहाचा वाटा होता. त्याने केवळ ५६ चेंडूत धडाकेबाज ९१ धावांची खेळी केली. त्यात त्याने ९ चौकार आणि ४ षटकार खेचले. सामन्यानंतर या खेळीबद्दल बोलताना राहुल म्हणाला की रोहित आणि विराट दोघेही आज आक्रमक पवित्र्याने मैदानावर उतरले होते. त्यांनी फलंदाजीला सुरूवात करताच मला त्यांचा इरादा समजला होता. दोघेही अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवत होते. इतिहासात प्रथम फलंदाजी करताना आमची (भारतीय संघाची) कामगिरी फारशी चांगली नाही. आकडेवारी पाहिली तर कोणीही ते सांगू शकेल. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला. निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी आम्हाला मिळाली आणि त्याचा आम्ही पूरेपूर लाभ घेतला. आगामी टी २० क्रिकेट मालिकांसाठी ही कामगिरी आमचा विश्वास दुणावणारी आहे, असे राहुल म्हणाला.

२४० धावा करू शकलो असतो, पण… – पोलार्ड

टी २० मालिकेत भारताची बाजी

भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा ठोकल्या. सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला. विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. पंतने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

सामना गमावला, तरीही पोलार्डने केला धमाकेदार पराक्रम

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार-षटकार खेचले. हेटमायर ४१, तर पोलार्ड ६८ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर, शमी, चहर आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.