28 October 2020

News Flash

IND vs WI : विंडीजचा ‘धडाकेबाज’ संघ जाहीर; पोलार्ड, रसल, ब्रेथवेट संघात

सुनील नरिनचेही संघात पुनरागमन

भारतीय संघाविरुद्ध विंडीजचा टी २० संघ जाहीर करण्यात आला. या संघात विंडीजच्या धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे विंडीजने संघ जाहीर केला. या संघात कायरन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यासारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय विंडीजच्या संघात फिरकीपटू सुनील नरिन याचेही पुनरागमन झाले आहे.

३ ऑगस्टपासून विंडीज विरुद्ध भारत या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी विंडीजच्या संघाची निवड करण्यात आले आहे. या २ सामन्यांसाठी कायरन पोलार्ड आणि सुनील नरिन या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेला आंद्रे रसलदेखील संघात आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार यष्टीरक्षक फलंदाज अँथनी ब्रॅम्बल हा १४ खेळाडूंच्या चमूतील नवा खेळाडू आहे. विंडीजच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला या संघात स्थान मिळाले आहे.

“विंडीजचा हा १४ खेळाडूंचा संघ अत्यंत समतोल आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडू अशा दोघांना संधी देण्यात आला आहे”, असे विंडीज क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष रॉबर्ट हेन्स यांनी सांगितले. “केवळ भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच नव्हे, तर आगामी टी २० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेत हा संघ निवडला गेला आहे. आतापासूनच आम्ही त्या विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आताच असे केले तर टी २० विश्वचषकासाठी आम्हाला संघ निवड करणे सोपे जाईल”, असेही त्यांनी नमूद केले.

विंडीजचा टी २० संघ – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, एव्हिन लुईस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, आंद्रे रसल, खरी पिअर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:18 am

Web Title: ind vs wi india west indies team squad announce kieron pollard andre russell carlos brathwaite sunil narine vjb 91
टॅग Ind Vs WI
Next Stories
1 ‘यॉर्कर किंग’ मलिंगा निवृत्तीनंतर श्रीलंका सोडणार
2 धोनीच्या निवृत्तीबाबत अझरुद्दीन म्हणतो…
3 पायाभूत क्रीडा सुविधांसाठी शासनाकडून तीन हजार कोटींची गुंतवणूक -शेलार
Just Now!
X