IND vs WI : चौथ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजला भारताकडून २२४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या विजयाबरोबर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.

बर्म्युडा संघाविरुद्ध २००७ साली भारताने वन डे इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला होता. या सामन्यात भारताने २५७ धावांनी बर्म्युडा संघाला पराभूत केले होते. त्यानंतर २००८ साली हाँगकाँगविरुद्ध २५६ धावांनी भारताने दुसरा मोठा वन डे विजयमिळवला. त्यामुळे आजचा विजय हा भारतासाठी तिसरा मोठा विजय ठरला. भारताने आज विंडीजला केवळ १५३ धावांवर बाद केले आणि २२४ धावांनी विजय मिळवला.

याबरोबरच विशेष म्हणजे हा भारताचा घरच्या मैदानावर सर्वात मोठा वन डे विजय ठरला. तसेच कसोटी खेळणाऱ्या एखादया संघाविरुद्धची हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.